सेलिब्रेशन
💁 सेलिब्रेशन आज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा. "खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाडी ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली. रात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण सकाळीच झाली. सकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज. मग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई