#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा
#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा लहानपणी शेजारच्या एका कडे नवीन टिव्ही आणी केबल चँनल आले होते. आम्ही सगळ्या मुलांनी एकत्रच 'झपाटलेला' बघितला. आणी सगळ्या पोरांवर तात्याविंचू स्वार झाला. मी 'बाबा चमत्कार'चं म्हणणं जरा जास्तच सिरिअसली घेतलं. 'तात्या विंचू' सारखं आपणपण थोडे दिवस बाहुल्यात राहायला जावं वाटायला लागलं.तसं माझी एकुलती एक आवडती बाहुली घेऊन आमच्या खाटेखाली जाऊन लपले. वनरुमकिचनच्या घरात हिच एक जागा माझी आवडती होती. बाहुलीच्या अंगावर हात ठेवून सुरु केलं "ओम भग भुगे भग्नी भागोदरी............ओम फट् स्वाहा...." तिनदा म्हणायचा होता मंत्र. पण दुसऱ्या मंत्रौच्चारालाच आईने खाटेचा झालरवाला पडदा सरकवून आत वाकून बघितलं. (मी मोठ्यानं मंत्र म्हणत होते तो तिने ऐकला असावा.) बाहेरच्या लख्ख्ं प्रकाशातून आतल्या अंधुक काळोखात तिला मी नाही दिसले. तरी सुद्धा तिच्या हाती लागु नये म्हणून मी जुन्या कपड्यांच्या बोचक्याच्या मागे जाऊन लपले. आई पडदा लावून निघून गेली तसा मी माझा कार्यक्रम पुन्हा सुरु केला. "ओम भगभुगे....."😂. पण त्या बाबाने म्हटल्य