साला एक मच्छर

साला एक मच्छर!!!,🐝🐝🐝

सकाळी सकाळी छान कोवळं ऊन खिडकीतुन स्वयंपाकघरात डोकावत असतं. गँसवर मस्त आल्याचा चहा तयार झालेला असतो. समोरच ओट्यावर चहाचा कप त्यावर गाळणी ठेऊन तुम्ही चहा ओतायच्या तयारीत असता.

इतक्यात एक मच्छर, रात्रभर गुडनाईट पिऊन आलेल्या गुंगीतच इकडून तिकडून डुलत येतो. त्याच आलं- घातलेल्या चहाचा वाफारा घेऊन नशा घालवावी म्हणुन ओट्यावर घुटमळायला लागतो. तुमच्या एका हातात गाळणी आणी एका हातात चहापात्र असल्यामुळे तुम्ही त्याला तोंडचलाखीनेच फूss..फूsss...करुन लांब पळवता.

अर्धा चहा ओतेस्तोवर तो तुम्हाला वळसा घालुन परत येतो. तुम्ही पुन्हा त्याला तुमची भाषा समजतेच या अपक्षेने "एss.... हुssड, शूक्....शूक्, अर्रेे याssर........ जाsssना..." करत चहा गाळायचं काम अर्धवट टाकून त्याला तिथुन पळवायच्या मागे लागता.

तोही तुमच्या सोबत एक-दोन सेकंद पकडापकडी खेळून झाली की येऊन चहाच्या गाळण्यावर बसतो. त्याला फटकावायच्या हिशोबाने तुम्ही एक जोरदार रट्टा त्या गाळण्याला मारता....,कपातला चहा कपासकट कलंडतो आणी गाळण्यातल्या गरमागरम चहापुडीचा लपका तुमच्या तोंडावर (ठप्पाक)येऊन बसतो. गडबडीने ती चहापुड (लपका) तुम्ही चेहवरुन झटकता आणी अख्या स्वयंपाक घरात फरशीवर ती पसरते.

उगाच कामात काम वाढवलं म्हणुन ज्याच्यावर तुम्ही प्रचंड चिडलेले असता तो मच्छर एवढ्या सगळ्यात  हुलकावणी देत गुपचुप खिडकीतुन बाहेर पळ काढतो. and you feel yeeeewwww😖😣 मगाशी काय तुला हिब्रूत सांगत होते का मी.???
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

लिमलेट-अंकल..🍬🍬

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या