गंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे

ईशारों-ईशारों मे
युग'गंपू'
वय-१५महिने

ती(ईशाऱ्याने): सोना ये ना रे ईकडे..थोडीशी पावडर (पावडरचा डब्बा दाखवत) लावू दे....

तो :(नकारार्थी मान डोलवत)नाही

ती: (परत ईशाऱ्यातच तोंडावर विनंतीचे भाव आणत..काजळाची डब्बी दाखवत) "बरं राजा ..काजळाचा टिक्का तरी लावूया.."

तो: चेहऱ्यावर लब्बाड हसू आणत...मानेनेच परत "मी नाही ज्जा"

ती : खोटं-खोटं रागवून.करंगळी त्याच्या पुढ्यात नाचवत "जा मग कट्टी तुझ्याशी."
Sssss
Sssss
Sssss
आssssssssssई
😣😣😣😣
गंप्या्sssss काय केलंस हे..?????
😣😣😣😣

तो: टाळ्या वाजवत "हँ....ही..ही...ही.

ती: (करंगळीवर त्याच्या दातांचे उमटलेले ठसे त्रयस्तपणे बघत)  त्याला रागाने "माझी करंगळी काय तुला लॉलीपॉप वाटली काय रे..???

तो: मंकी फेस करुन "यो...दुग्गु..डुग्गु.."

😢
इती: आगाऊगंपूची बिचारीआई

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी