भाकरी - स्वयंपाक घरात गवसलेले सुख

भाकरी
स्वयंपाक घरात गवसलेले सुख-भाकरी


परातीत (बाजरी/ज्वारी/नाचणीच्या )पिठाचा डोंगर घालायचा मग हातानेच त्यात मध्यभागी एक खड्डा करायचा. त्या खड्ड्यात थोडे warm (lukewarm n hot च्या मधले) पाणी घालायचे मग हळू हळू खड्ड्याच्या चहो बाजूनी असलेल्या पिठाच्या डोंगराला त्या खड्ड्यात ढकलायचं (पाडायचं).
आधी हलक्या हातानेच मिक्स करायचं नंतर हात थंड पाण्यात बुडवुन (हात भाजू नयेत म्हणून) पिठ व्यवस्थित मळून घ्यायचं.
आता ह्या मळलेल्या पिठावर आपलंच राज्य असतं एक एक गोळा परातीत घेऊन त्याच्या पाठीवर जोरजोरात (पण हलकेच) धपाटे घालत स्वताःभोवतीच प्रदक्षिणा घालायला लावायची अगदी त्या गोळ्याची figure maintain होईस्तोवर थापायचं.
आता ह्या भाकरीला आधी तव्यात पाण्याचा हात लावून नी मग ग्यासच्या मध्यम आचेवंर वा चुलीच्या निखाऱ्याच्या धगीवर नीट भाजले की झाली भाकरी तयार.

चेहऱ्यावर एकही डाग नको म्हणून भाकरीला Fair & lovely लावल्यासारखे पांढरे फटक (नाचणीची असल्यास फिरंगी लाल) बाहेर काढू नका. त्यावर आलेले छोटे छोटे ठिपके ब्युटीस्पॉट समजा तिचे.

अशाप्रकारे मस्त गरमागरम खरपुस पापुद्रा असलेली किंचितशी सुटलेल्या पोटाची भाकरी त्यावर लोण्याचा गोळा ठेऊन खायला बसलात की सुखाची प्रचिती येईल.

सोबत तीळकुट, शेंगदाण्याच कुट, तेल,मीठ, लाल तिखटाच मिश्रण केलेली चटणी आणी तोंडी लावायला कांदा असेल तर समोर शाही जेवण पण फिकेच.
😋

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

लिमलेट-अंकल..🍬🍬

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या