आईची रेसिपी - गुलगुलं

#गुलगुलं

नुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.
शाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.

 गव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.

 लहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.

बनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬