गंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे
ईशारों-ईशारों मे युग'गंपू' वय-१५महिने ती(ईशाऱ्याने): सोना ये ना रे ईकडे..थोडीशी पावडर (पावडरचा डब्बा दाखवत) लावू दे.... तो :(नकारार्थी मान डोलवत)नाही ती: (परत ईशाऱ्यातच तोंडावर विनंतीचे भाव आणत..काजळाची डब्बी दाखवत) "बरं राजा ..काजळाचा टिक्का तरी लावूया.." तो: चेहऱ्यावर लब्बाड हसू आणत...मानेनेच परत "मी नाही ज्जा" ती : खोटं-खोटं रागवून.करंगळी त्याच्या पुढ्यात नाचवत "जा मग कट्टी तुझ्याशी." Sssss Sssss Sssss आssssssssssई 😣😣😣😣 गंप्या्sssss काय केलंस हे..????? 😣😣😣😣 तो: टाळ्या वाजवत "हँ....ही..ही...ही. ती: (करंगळीवर त्याच्या दातांचे उमटलेले ठसे त्रयस्तपणे बघत) त्याला रागाने "माझी करंगळी काय तुला लॉलीपॉप वाटली काय रे..??? तो: मंकी फेस करुन "यो...दुग्गु..डुग्गु.." 😢 इती: आगाऊगंपूची बिचारीआई